25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeमनोरंजनमिथून चक्रवर्तींचा भाजपात प्रवेश; पंतप्रधानांच्या सभेपूर्वी हाती घेतले कमळ

मिथून चक्रवर्तींचा भाजपात प्रवेश; पंतप्रधानांच्या सभेपूर्वी हाती घेतले कमळ

एकमत ऑनलाईन

कोलकाता : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या भेटीपासून ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्याचा खुद्द मिथून चक्रवर्ती यांच्याकडून इन्कार केला जात होता. काल (६ मार्च) सायंकाळी मिथून यांनी पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे ठामपणे सांगितले जात होते. त्यामुळे मिथून चक्रवर्ती फक्त मोदींसोबत व्यासपीठावर हजेरी लावणार की पक्षात प्रवेश करणार याकडे लोकांचे लक्ष लागले होते. अखेर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले असून, पंतप्रधानांच्या सभेपूर्वी त्यांनी कमळ हाती घेतले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जोरदार प्रचार सुरू आहे. आठ टप्प्यात मतदान होणार असून, उमेदवारांच्या नावांचीही घोषणा केली जात आहे. त्यामुळे आता बंगालमध्ये प्रचाराचा पारा वाढताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (०७ मार्च) पश्चिम बंगाल दौ-यावर असून, ते कोलकातामध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहे. याचदरम्यान अभिनेते मिथून चक्रवर्ती त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. हे वृत्त खरे ठरले आहे. मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पक्षात प्रवेश केला.

२०११ मध्ये मिथुन होते टीएमसीत
२०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. आज पुन्हा एकदा मिथून यांनी बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवले आहे.

मोहन भागवत यांची भेट ते पक्षप्रवेश
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागील महिन्यात मिथून चक्रवर्ती यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर मिथून चक्रवर्ती भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, ही भेट कौटुंबिक असल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले होते़ मात्र, बंगालच्या राजकीय वर्तुळात मिथून चक्रवर्ती भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरूच होत्या. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची आज (७ मार्च) कोलकाता प्रचारसभा आहे. यातच काल मिथून चक्रवर्ती यांनी बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीची माहिती विजयवर्गीय यांनी ट्विट करून दिली. त्यामुळे मिथून भाजपात प्रवेश करणार असल्याच जवळपास निश्चित मानले जात होते़

 

टीम इंडियाचा दणदणीत विजय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या