29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeमनोरंजनवयाच्या ७५ व्या वर्षी मुमताजचे वर्कआऊट

वयाच्या ७५ व्या वर्षी मुमताजचे वर्कआऊट

एकमत ऑनलाईन

मुंबई : साठ आणि सत्तरच्या दशकात आपल्या अभिनयासोबत सौंदर्यामुळेही लोकांच्या मनावर राज्य करणा-या मुमताज सध्या सोशल मीडियावर भलत्याच सक्रिय पहायला मिळत आहेत. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. पदार्पणानंतर लागलीच मुमताजनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही सुंदर झलक चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. मुमताजने मुलगी नताशा माधवानीसोबत वर्कआऊट करतानाचा व्हीडीओ शेअर केला आहे.

मुमताजने इन्स्टाग्रामवर सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियन आयडल’चा एक व्हीडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती स्टेजवर धडाकेबाज डान्स करताना दिसत आहे. ७५ वर्षांच्या वयात मुमताजच्या एनर्जेटिक डान्स मूव्हज पाहण्यासारख्या आहेत.
मुमताजची ही झलक पाहून चाहते भलतेच एक्सायटेड आहेत आणि अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

मुमताजने काही असे व्हीडीओ शेअर केले आहेत,ज्यात ती वर्कआऊट करताना नजरेस पडत आहे. वयाच्या या टप्प्यावर अभिनेत्रीची जिद्द सगळ्यांनाच हैराण करताना दिसत आहे. चाहते मुमताजच्या या वर्कआऊटला पाहून हैराण होताना दिसत आहेत.

मुमताज यांच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर त्यांनी ११व्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने ६०च्या दशकात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारायला सुरुवात केली.
मुमताजनी सगळ्यात जास्त सिनेमे दारा सिंगसोबत केले. ‘फौलाद’, ‘डाकू मंगल सिंग’ सारख्या अ‍ॅक्शन सिनेमांत मुमताज आणि दारा सिंग एकत्र दिसले होते. १९६९ मध्ये आलेल्या ‘दो रास्ते’ सिनेमाने मुमताजच्या करिअरला योग्य दिशा दिली आणि मग ‘आप की कसम’, ‘चोर मचाए शोर’, ‘रोटी’, ‘प्रेम कहानी’, ‘तेरे मेरे सपने’, ‘हरे राम हरे कृष्णा’ आणि ‘नागिन’ सारखे सिनेमे त्यांनी केले.

त्यानंतर मुमताजनी मध्येच १३ वर्षांचा ब्रेक घेतला आणि १९९० मध्ये त्यांनी ‘आंधिया’ सिनेमातून कमबॅक केले. मुमताजने हिट सिनेमा देत कमबॅक केले तरी देखील त्यांनी सिनेइंडस्ट्रीला रामराम ठोकला.
त्यानंतर काही आठवडे आधीच त्या धर्मेंद्र यांच्यासोबत ‘इंडियन आयडल १३’ मध्ये दिसल्या होत्या.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या