22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमनोरंजनमाझे बाळ या जगात नाही; दिया मिर्झाने शेअर केली भावूक पोस्ट

माझे बाळ या जगात नाही; दिया मिर्झाने शेअर केली भावूक पोस्ट

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा गुपचूप पद्धतीने लग्न केल्यानंतर प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर सध्या ती समाजात घडणा-या घटनांवर तिचे मत नोंदवत असल्यामुळे चर्चेत येत आहे. परंतु, यावेळी तिने एक भावूक पोस्ट लिहित नेटक-यांचे लक्ष वेधले आहे. माझे बाळ या जगात नाही, असे म्हणत तिने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

दिया मिर्झाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या २५ वर्षीय भाचीच्या निधनाविषयी भाष्य केले आहे. भाचीच्या अचानकपणे झालेल्या निधनामुळे दिया भावनाविवश झाली असून तिने हे दु:ख शब्दांत मांडले आहे.

माझी भाची, माझं बाळ आणि माझं मूल आता या जगातच नाही. तू जिथे कुठे असशील तिथे तुला प्रेम आणि शांती मिळो. तू नेहमीच आम्हाला हसवलेस. तू जिथे असशील तिथे तुझे नाचणे, हसणे आणि गाण्याने आनंद बहरेल. ओम शांती, असे कॅप्शन देत दियाने तिच्या भाचीचा फोटो शेअर केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या