मुंबई : ‘बिग बॉस’फेम अभिजित बिचुकले सातत्याने चर्चेत असतो. आपल्या पत्नीला आपण महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार, असे विधान आता त्याने केले आहे. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे घराघरांत पोहोचलेला अभिजित बिचुकले सातत्याने लाईमलाईटमध्ये असतो.
मुलाखती, वक्तव्ये, टिप्पण्या, या सगळ्यामुळे कायमच त्याचा विषय गाजत असतो. आता त्याने आपल्या पत्नीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनवण्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
अभिजित बिचुकलेने आपल्याला मुख्यमंत्री तसेच राष्ट्रपती होण्याची इच्छा आहे, असेही अनेकदा बोलून दाखवले होते. आता त्याने आपल्या पत्नीलाही पुढे आणले आहे. पत्नी अलंकृताच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने एक पत्र लिहिले असून त्याचे शीर्षक महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असे आहे. या आधीही २००९ साली अलंकृता यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती.