मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने मी टूचे आरोप केले होते. त्यामुळे चर्चेत आली होती. तनुश्रीचे नाव किंबहूना त्या मी टू च्या आरोपांमुळे अनेकांना माहिती झाले असे सांगितले जाते. त्या प्रकरणानंतर नाना पाटेकर चर्चेत आले होते. त्यांनी आपल्यावर केलेले आरोप फेटाळले होते. रितसर तनुश्रीच्या विरोधात देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्या प्रकरणाला दहा वर्षांहून अधिक काळ लोटला होता त्याला तनुश्रीने तोंड फोडले होते. सोशल मीडियाच्या आधारे तिनं नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले होते.
नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांचे ते मी टू चे प्रकरण त्यावेळी सर्वाधिक चर्चेतील प्रकरण होते. नाना पाटेकर यांनी ठामपणे आपली भूमिका मांडली होती. आता पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण म्हणजे तनुश्रीने तिच्या इंस्टावरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिने पुन्हा एकदा नानांवर निशाणा साधला आहे. तिच्या त्या पोस्टला नेटक-यांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी काहींनी पुन्हा एकदा तनुश्रीला ट्रोल केले आहे. आपल्या पोस्टमध्ये तनुश्री म्हणते, माझ्यासोबत काही झाल्यास नाना पाटेकर आणि त्यांच्या वकिलांची टीम, याशिवाय बॉलीवूडमधील माफिया जबाबदार असतील.