26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमनोरंजननाना पाटेकरांनी घेतली सुशांतच्या कुटुंबीयांची भेट म्हणाले.....

नाना पाटेकरांनी घेतली सुशांतच्या कुटुंबीयांची भेट म्हणाले…..

एकमत ऑनलाईन

पाटणा: अभिनेते नाना पाटेकर यांनी आज पाटण्यात सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सुशांतचे वडिल कृष्णकुमार सिंह यांना ते भेटले आणि त्यांचं सांत्वन केलं. सुशांतचं जाणं हा आमच्या सगळ्यांसाठी मोठा धक्का होता. तो अतिशय गुणी आणि उत्तम अभिनेता होता अशी प्रतिक्रिया नानांनी या भेटीनंतर दिली. त्यावेळी नाना पाटेकर भावूक झाले होते. हा धीर आणि संयमाचा काळ असल्याचंही त्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सांगितलं. सुशांतला नक्कीच न्याय मिळेल असंही ते म्हणाले.

Read More  भारत-जपान नौदलाचा संयुक्त सराव

एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमासाठी नाना पाटेकर पाटण्यात आले आहेत. 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली होती. मुंबईतल्या फ्लॅटमध्ये त्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. मुंबई पोलीस त्याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या