27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमनोरंजननाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार लवकरच अभिनय क्षेत्रात येणार

नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार लवकरच अभिनय क्षेत्रात येणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा आगळा वेगळा ठसा उमटविणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर, केवळ अभिनय, संवाद फेकीच्या जोरावर या अभिनेत्यानं बॉलीवूडमध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रस्थापित बॉलीवूड कलाकारांच्या तुलनेत सौंदर्याच्या, देखणेपणाच्या व्याख्येत न बसणारे नाना हे कायमच त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्गही तुफान आहे. नानांचा चित्रपट आवर्जुन पाहणारा खास प्रेक्षक आहे. यासगळ्यात नानांच्या मुलानं देखील याच क्षेत्रातून पुढे येण्याचा निर्णय घेतला आहे.

नानांच्या मुलाचा मल्हारचा आणि नानांच्या चाहत्यांचा फारसा परिचय नाही. त्यानंही नानांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची तयारी केली आहे. खरं तर यापूर्वी नानानं जेव्हा राम गोपाल वर्मा यांचा २६/११ नावाचा चित्रपट केला होता त्यावेळी त्या चित्रपटचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मल्हारनं जबाबदारी पार पाडली होती. आता त्याला प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी होती. मात्र नाना आणि प्रकाश झा यांच्यातील वादाचा फटका मल्हारला बसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे एका नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मल्हार प्रेक्षकांसमोर येणार आहे.

मल्हार हा नानांची सेम टू सेम कॉपी आहे असं म्हटलं जातं. नानांनी अभिनेत्री आणि बँक ऑफिसर नीलकांती पाटेकर यांच्याशी विवाह केला. त्यांना मल्हार नावाचा मुलगा आहे. मल्हारबाबत सांगायचे झाल्यास त्यानं मुंबईतील सरस्वती मंदिर येथून शालेय शिक्षण पूर्ण घेतले आहे. त्यानंतर त्यानं कॉमर्सची पदवी घेतली आहे. लहानपणापासून मल्हारला चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड होती. ती त्यानं जपली आहे. मल्हारनं राम गोपाल वर्मा यांच्या २६/११ मध्ये असिस्ट डिरेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. मल्हारनं स्वताचे प्रॉडक्शन हाऊस तयार केले असून त्याला त्यानं नाना पाटेकर यांचे नाव दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर यांच्या मल्हारच्या चित्रपट क्षेत्रातील इंट्रीबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्याला दिग्दर्शनामध्ये रस असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या