25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजननवाजुद्दीन सिद्दीकी ईदसाठी मुंबईहून उत्तर प्रदेशला, 14 दिवस सहकुटुंब क्वारंटाईन

नवाजुद्दीन सिद्दीकी ईदसाठी मुंबईहून उत्तर प्रदेशला, 14 दिवस सहकुटुंब क्वारंटाईन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात ‘कोरोना व्हायरस’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर झाला आहे. मात्र बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याचे कुटुंबीय ईद साजरी करण्यासाठी मुंबईहून उत्तर प्रदेशला गेले. त्यामुळे नवाजुद्दीनसह त्याच्या कुटुंबियांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याचे कुटुंबीय लॉकडाऊनच्या काळात मुंबईहून उत्तर प्रदेशातील बुढाना या गावी गेले. आंतरराज्य प्रवास केल्याने नवाझुद्दीनच्या सर्व कुटुंबाला 14 दिवसांसाठी घरीच अलग ठेवण्यात आले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी शुक्रवारी आपल्या कुटुंबासह बुढाना गावी पोहोचला. तिथे त्या सर्वांची पूर्ण तपासणीही करण्यात आली. नवाजुद्दीन आणि त्याच्यासोबत असलेल्या सर्व सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी महाराष्ट्र सरकारच्या परवानगीने खासगी वाहनातून आपल्या गावी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या