मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीची लेडी सुपरस्टार नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश सिवन ९ जून रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. चेन्नईजवळील महाबलीपूरम येथील एका रिसॉर्टमध्ये या कपलने लग्न थाटले. नयनतारा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
तर विग्नेश हा सुप्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहे. लग्नानंतर नयनताराही अशा अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे, ज्यात महिला जोडीदाराची तिच्या पतीपेक्षा जास्त संपत्ती आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नयनतारा जवळपास १६५ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी ३ ते ५ कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय, ती जीआरटी ज्वेलर्स सारख्या कंपन्यांचा समावेश असलेल्या ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करते. नयनताराने ५० सेकंदाच्या जाहिरातीसाठी ५ कोटी रुपये घेतले होते