23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeमनोरंजनएनसीबी भारती, हर्षच्या कस्टडीची पुन्हा केली मागणी

एनसीबी भारती, हर्षच्या कस्टडीची पुन्हा केली मागणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : कॉमेडिअन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या ड्रग्स प्रकरणी अडचणी वाढताना दिसत आहेत. एनसीबीने स्पेशल कोर्टात जाऊन त्यांचा जामीन कॅन्सल करणे आणि कस्टडीमध्ये घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये दोघांनी ८६.५ ग्रॅम गांजासह अटक केली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसांनी जामीन मिळाला होता. आता रिपोर्ट्स आहे की, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो त्याचा जामीन कॅन्सल करण्याच्या तयारीत आहे.

नोव्हेंबरमध्ये एनसीबीने भारतीच्या मुंबईतील घरी छापा मारला होता. भारती आणि तिचा पती हर्ष दोघेही ड्रग्स घेतल्याप्रकरणात दोषी आढळले होते. एनसीबीने दोघांना अटक केली होती. सुशांत सिंह राजपूत केसमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले होते़ या चौकशीच्या क्रमात भारती आणि हर्षला अटक करण्यात आली होती. त्यांना एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार, गांजा ठेवणे आणि घेण्यासाठी दोषी ठरवण्यात आले होते. एनसीबीने सांगितले होते की, भारती आणि हर्षने गांजा घेतल्याचे कबूल केले होते.

दाऊदची मालमत्ता १.१० कोटींना विकत घेतली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या