मुंबई : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री नीतू कपूरने मर्सिडीज मेबॅक जीएलएस ६०० ही नवी आलिशान कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत २.९२ कोटी रुपये आहे. आलिशान कार तिच्या आलिशान फीचर्स आणि प्रेजेंससाठी ओळखली जाते.
या नवीन गाडीची मालकीण बनून नीतू आता अर्जुन कपूर, रणवीर सिंग आणि आयुष्मान खुराणा यांसारख्या अनेक ए-लिस्ट सेलिब्रिटींच्या क्लबमध्ये सामील झाली आहे ज्यांच्याकडे ही अल्ट्रा-लक्झरी कार आहे.
मुंबईतील मर्सिडीज-बेंझ कारच्या फ्रँचायझी भागीदाराच्या अधिकृत पेजने इन्स्टाग्रामवर नीतू कपूरची नवीन कार उघड करताना नीतू कपूरचा व्हीडीओ आणि फोटो शेअर केला आहे. नीतू तिची नवीन कार फ्लाँट करताना आणि हसताना दिसत आहे. एका फोटोत ती टीमसोबत एक मोठा चॉकलेट केक कापून आनंदोत्सव साजरा करताना दिसली.
अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी या मल्टीस्टारर कौटुंबिक चित्रपट ‘जुग जुग जीयो’ सह नीतूने नऊ वर्षांच्या विश्रांतीनंतर अभिनयात पुनरागमन केले. मार्च २०२० मध्ये पती-अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर तिने या चित्रपटात काम केले. ती गेल्या वर्षी कलर्सच्या रिअॅलिटी शो ‘डान्स दीवाने ज्युनियर्स’मध्ये जज म्हणूनही होती.
या वर्षी प्रदर्शित होणा-या ‘लेटर्स टू मिस्टर खन्ना’ या आगामी चित्रपटात ही अभिनेत्री सनी कौशलच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. मिलिंद धमाडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.