30.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home मनोरंजन आईच्या जुन्या साडीतून मुलांसाठी नवे कुर्ते

आईच्या जुन्या साडीतून मुलांसाठी नवे कुर्ते

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांसह बॉलिवुड कलाकारांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. बॉलिवूडकर या निमित्ताने आपले फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. नेहमीप्रमाणे दिवाळीच्या दिवशीही बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

रितेश नेहमीच एका अनोख्या शैलीत चाहत्यांना शुभेच्छा देत असतो. दिवाळी निमित्तानेही त्याने असाच एक हटके व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख आपल्या दोन मुलांसह कुर्ता-पायजामा परिधान केलेला दिसत आहे. विशेष म्हणजे हे कपडे त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून तयार केले गेले आहेत.

स्वत: रितेशने यासंदर्भात माहिती दिली आहे. दिवाळीनिमित्त रितेश देशमुख यांने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशची आई हवेत साडी झटकताना दिसत आहे. तर, काही सेकंदात रितेश देशमुख आणि त्याची दोन्ही मुले एकाच रंगाचे कपडे घालून दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. आईची जुनी साडी, मुलांसाठी दिवाळीचे नवीन कपडे. दिवाळीच्या शुभेच्छा, असे कॅप्शन देत रितेश देशमुखने हा व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओला काही वेळातच लाखो व्ह्युव्ज मिळाले आहेत.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या