27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमनोरंजनप्रियंकाला नव-याने दिलं खास गिफ्ट

प्रियंकाला नव-याने दिलं खास गिफ्ट

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या आगामी वेब सिरीजच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेली प्रियांका शुटींगचे अनेक फोटो शेअर असते.
काही दिवसांआधी तिने एक फोटो शेअर केला होता ज्यात ती जखमी अवस्थेत दिसत होती. तिच्या त्या फोटोची देखील बरीच चर्चा झाली होती. ती चर्चा थांबत नाही तर पुन्हा प्रियांकाच्या नव्या पोस्टची चर्चा रंगली आहे. प्रियांकाने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती एका मॉर्डन गाडीत बसल्याचे दिसत आहे.

प्रियांकाची ही पोस्ट आणि गाडी तिच्यासाठी फारचं खास आहे. कारण ही गाडी तिला नवरा निक जोनस ह्याने गिफ्ट केली आहे. त्यामुळे प्रियांका सध्या नव-यावर प्रचंड खुश झाली असून तिने निकवरील प्रेम आपल्या पोस्टमधून व्यक्त केलं आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका कुल गाडीत बसलेली दिसत आहे.

त्या गाडीवर मिसेस जोनस असे ठळक अक्षरात लिहीलं आहे. सिल्वर ग्रे कलरची ही गाडी असून प्रियांकाने देखील तसेच मॅचिंग आऊटफिट्स घातले आहेत. तर ब्लॅक सनग्लासेसमध्ये प्रियांका स्टाइलमध्ये गाडी चालवताना दिसत आहे. निकने थेट प्रियांकाच्या शुटींग सेटवरच हे सप्राइज गिफ्ट पाठवलं.
नव-याने गिफ्ट केलेल्या गाडीत बसलेली प्रियांका फारच आनंदी दिसत असून तिने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये निक जोनसचं कौतुक करत ‘तु बेस्ट नवरा आहेस’, असं म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या