21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमनोरंजनमानलेल्या भावाशीच निशाचे अफेयर ; करण मेहराने केला गौप्यस्फोट

मानलेल्या भावाशीच निशाचे अफेयर ; करण मेहराने केला गौप्यस्फोट

एकमत ऑनलाईन

मुंबई : निशा तिच्याच मानलेल्या भावासोबत रिलेशनशिपमध्ये असून, दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचा खुलासा ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराने नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आपली पूर्व पत्नी निशा रावल याच्याषियी केला आले.तसेच करणने निशाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

दरम्यान लोकप्रिय टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ‘नैतिक’ची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात गेल्या १४ महिन्यांपासून वाद सुरु आहेत. दरम्यान, करण मेहराने निशावर विवाहबा संबंधांचे गंभीर आरोप केले आहेत. करणने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली.

याशिवाय निशा आणि तिचा प्रियकर आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत ​​असल्याचे करणने सांगितले आहे.
करण मेहराने मीडियाशी बोलताना निशा रावलवर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी त्याने सांगितले की, निशाचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे. याचा खुलासा करताना तो म्हणाला, ‘रोहित सेठिया नावाचा एक व्यक्ती १४ महिन्यांपासून माझ्या पत्नीसोबत एकाच घरात राहत आहे. या व्यक्तीसोबत निशाचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या