24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमनोरंजनमोदींपेक्षा चांगला श्रोता नाही : विवेक अग्निहोत्री

मोदींपेक्षा चांगला श्रोता नाही : विवेक अग्निहोत्री

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. ट्विटवर विवेक म्हणतात त्यांना आपल्या जीवनात नरेंद्र मोदींसारखा श्रोता मिळालाच नाही. यावर यूजर्संनी त्यांची फिरकी घेत प्रश्न विचारायला सुरुवात केली.

विवेक अग्निहोत्री ट्विटरवर लिहितात, जेव्हा तुम्ही कोणाचे म्हणणे ऐकता आणि केवळ आपली मान हलवत असता, त्यावेळी ते बोलणा-यात ऑक्सीटोसिन सोडते. ऑक्सीटोसिन एक तालमेल आणि विश्वास निर्माण करणारा न्युरोकेमिकल आहे. आपल्या चौहूबाजूंनी पाहा, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास करता, ते सर्व चांगले श्रोते असायला हवे. ऐकणे कला नाही, विज्ञान आहे. #रचनात्मक चेतना.

पुढे अग्निहोत्री म्हणतात, मी आपल्या पूर्ण आयुष्यात ज्या महान श्रोत्याला भेटलो आहे ते आहेत नरेंद्र मोदी. तुम्ही सांगा तुमच्यासाठी कोण आहेत? यावर युजर्सने दिग्दर्शकाची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. स्वप्निल नावाच्या यूजरने विचारले, आता कोणत्या चित्रपटाचे प्रमोशन करायचे आहे ? यावर उत्तर देताना विवेक म्हणाले, सायलन्ट फिल्म. दुस-या एका यूजरने लिहिले, विवेकने आतापर्यंत जे काही म्हटले आहे, त्यावर कोणत्याही सर्वसामान्य माणसाला ऐकणे अवघड आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या