मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा ‘शकुंतलम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर आता ती बॉलिवूड सिनेमांतही झळकणार आहे. ती वरुण धवनसोबत सिटाडेलमध्ये दिसणार आहे. परंतु अनुष्का शर्मा एका वेब सीरिजसाठी एकत्र येत असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
दरम्यान, सध्या मनोरंजन विश्वावर साउथ चित्रपटांचा वर्चस्व पहायला मिळत आहे. त्यातच साउथ अभिनेत्रींचीही खुपच चर्चा असते. अनेक सौदर्यंवती दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात आहेत. त्यातच अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या अभिनयाबरोबरचं सौदर्यंसाठीही लोकप्रिय आहे.
अशातच समांथा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याबद्दल एक बातमी खुप चर्चेत होती. ती म्हणजे या दोन्ही एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. मात्र आता सामंथाने या वृत्ताचे खंडण केले आहे.
अलीकडेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की समंथा आणि अनुष्का एका वेब सीरिजसाठी एकत्र येत येणार आहे. ही वेबसिरिज महिला-केंद्रित असल्याचंदेखील बोलल जात होतं. त्याचबरोबर या प्रोजेक्टसाठी दोन्ही तयार आहेत आणि आता या विषयी जेव्हा समांथाला विचारण्यात आले त्यावेळी मात्र अभिनेत्रीने या बातमीचे खंडण केले.
तिने या बातमीला स्पष्ट नकार दिला. एका मुलाखतीत सामंथानं सांगितल की ती तिच्या करिअरमध्ये असा कोणताही प्रोजेक्ट करत नाही आहे. तिने अनुष्का शर्मासोबत इतर कोणत्याही प्रोजेक्टसाठी एकत्र येणार नाही. या बातमीनंतर समंथा आणि अनुष्काचे चाहते थोडे नाराज झाले आहेत.