25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमनोरंजननोमेडलँडला ऑस्कर जाहीर

नोमेडलँडला ऑस्कर जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात होणारा ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळा यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन घेण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात २०२१ मधील नोमेडलँड या चित्रपटाला यंदाचा ऑस्कर जाहीर झाला आहे. त्याचबरोबर तो यंदाचा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. २०२१ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता इरफान आणि अभिनेता भानु अथैया यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

नोमेडलँड या सिनेमाने २०२१ च्या सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारावर नाव कोरले आहे. नोकरी गेल्यानंतर घराबाहेर पडून फिरायला निघालेल्या एका महिलेची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिने या सिनेमात या महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका अशा एकूण सहा श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

नोमेडलँड या सिनेमाच्या दिग्दर्शिका क्लोई जाओ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अभिनेते अँथनी हॉपंिकस यांना द फादर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडॉर्मंडने नोमाडलँड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.

दुस-या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या