31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeमनोरंजनआता आदित्य अन् अनन्याचा नंबर

आता आदित्य अन् अनन्याचा नंबर

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लगीन घाई सुरु आहे. तर कीहींच्या अफेअरच्या चर्चाही जोरात सुरु आहे. त्यात भुमी असोकिंवा तमन्ना या अभिनेत्रींही चर्चेत आहेत. आता यातच बी-टाऊनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्यात ही काहीतरी शिजत असल्याच्या बातम्या जोर धरु लागल्या आहेत.
नुकतेच सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते आणि ते दोघे एकत्र पार्टीत पोहोचले होते. तेव्हापासून ही बातमी चर्चेत आली. आता अनन्याने आदित्य रॉय कपूरच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेबसिरीजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती.

आता त्यातच करण जोहरनेही या दोघांच्या नात्याबद्दल एक इशारा दिला आहे. करण जोहरने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरबद्दल हिंट दिली होती. करणच्या या शोमध्ये त्याने अनेक जोडींच्या केमेस्ट्रीबद्दल बोलले आहे आणि त्या जोड्या नंतर लग्न बंधनात अडकल्या आहेत. माझ्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत मी अनन्या आणि आदित्य यांच्यातील उत्तम केमिस्ट्री पाहिली असे करणने सांगितले होते. यानंतर जुलै २०२२ मध्ये अनन्या आणि आदित्यच्या अफेअरची बातमी समोर आली होती. कॉफी विथ करणमध्ये अनन्यानेच आदित्य रॉय कपूरला हॉट म्हटले आहे.

त्यानंतर पुन्हा आदित्य आणि अनन्या दोघही मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले. ब्लॅक आउटफिटमध्ये दोघेही खूपच आकर्षक दिसत होते. डिसेंबर २०२२ मध्येही दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघेही एकत्र ‘फिफा वर्ल्ड कप २०२२’ पाहण्यासाठी कतारला पोहोचले होते. आता पुन्हा अनन्या आणि आदित्य रॉय कपूर चर्चेत आले जेव्हा दोघांनी सिड-कियाराच्या रिसेप्शनमध्ये एकत्र पोज दिली. अनन्याने काळ्या रंगाची साडी नेसली होती, तर आदित्य काळ्या रंगाच्या सूटमध्ये ट्यूनिंग केली होती. दोघांची जोडी खूप छान दिसत होती. आता अनन्या-आदित्य हे बॉलिवूडचे पुढचें जोडपे मानले जात आहे. त्याच बरोबर दोघांचे चाहतेही या जोडीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या