मुंबई : बॉलिवूड चित्रपटनिर्माता करण जोहर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तो प्रियंका चोप्राच्या बॉलिवूडबाबतच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
खरे तर कंगना राणावतने करण जोहरवर प्रियंका चोप्राला धमकावल्याचा आरोप केला. बॉलिवूडमध्ये तिचा छळ केला जात होता आणि त्याचबरोबर असे अनेक आरोप तिने करणवर लावले. खरे तर कंगना नेहमीच करण जोहरवर आणि बॉलिवूड माफिया गँगवर टीका करत असते. मात्र त्यावर कोणीही प्रतिक्रिया देत नाहीत .
दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून कंगना राणावतचे नाव न घेता तिची खिल्ली उडवली आहे.
करणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सांगितले की, लोकांनी विमानतळावर पत्रकार परिषद कशी घेतली. त्याने लिहिले, विमानतळ एक रनवे आहे… तिथे पत्रकार परिषद देखील घेतली जाते…. पुढच्या वेळी तिथे ट्रेलर लॉन्चही होऊ शकतं! (मी त्याचे सदस्यत्व घेतो…कोणतीही तक्रार नाही… मात्र कधी फ्लाईट पकडणं खूप छान आहे…)
करण जोहरने कंगनाचे नाव न घेता टोमणा मारल्याचे अनेकांचे मत आहे. नुकताच कंगना राणावतचा व्हीडीओ समोर आला होता. जेव्हा ती विमानतळावर दिसली होती यावेळी कंगना म्हणाली, तुम्ही लोक फार हुशार आहात. जेव्हा काही वाद होतो तेव्हा तुम्ही बॉलिवूड माफियांना अजिबात प्रश्न विचारत नाही आणि माझ्यावरून काही वाद झाला तर लगेच मला प्रश्न विचारून भंडावून सोडता.