22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजनतीन महिन्यांत सलमानवर दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न

तीन महिन्यांत सलमानवर दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

मुंबई : सलमान खान गेल्या ४ वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर आहे. या टोळीने एवढ्या वर्षांत सलमानच्या हत्येचा ४ वेळा प्रयत्न केला होता. या प्रकरणी आता पंजाब पोलिसांनी गुरुवारी नवा खुलासा केला असून, त्यात लॉरेन्स टोळीने ३ महिन्यांत सलमानवर हल्ल्याचे आणखी दोन प्रयत्न केले. या टोळीने सलमानला त्याच्या फार्म हाऊसच्या वाटेवर मारण्याचा कट रचला होता.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायक सिद्धू मुसेवालाला मारण्यापूर्वी लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचला होता. प्लॅन ए अयशस्वी झाल्यानंतर टोळीने प्लॅन बी तयार केला. मात्र, याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही. या योजनेचे नेतृत्व गोल्डी ब्रार करत होता. गोल्डीने सलमानला मारण्यासाठी कपिल पंडितची (लॉरेन्स गँगचा शार्प शूटर) निवड केली होती आणि पनवेल फार्म हाऊसवर जाताना अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चंदीगडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत डीजीपी गौरव यादव बोलत होते. त्यांच्यासोबत अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे प्रमुख एडीजीपी प्रमोद बनही उपस्थित होते.

चारवेळा आखला होता प्लॅन
सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्सने ४ वेळा प्लॅन केला होता. यासाठी त्याने एक रायफलही खरेदी केली होती. लॉरेन्सने २०१८ मध्ये सलमानला मारण्यासाठी शूटर संपत नेहराला मुंबईत पाठवले होते. संपतकडे पिस्तूल होते. सलमान पिस्तुलच्या रेंजपासून खूप लांब होता. त्यामुळे त्याला मारता आले नाही. नंतर लांब पल्ल्याची रायफल ४ लाख रुपयांना विकत घेऊन संपतला देण्यात आली. सलमानला मारण्यापूर्वीच तो पकडला गेला. त्यानंतर लॉरेन्सने आणखी दोन प्रयत्न केले, असे सांगण्यात आले.

पनवेलमध्ये राहात होते शार्प शूटर्स
कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि बाकीचे शूटर्स पनवेल येथे भाड्याच्या खोलीत राहिले. कारण पनवेल येथे सलमानचे फार्म हाऊस आहे. येथे ते शूटर्स सुमारे दीड महिना राहिले. लॉरेन्स गँगच्या या सर्व शूटर्सनी सलमानवर हल्ला करण्यासाठी लहान शस्त्रे, पिस्तूल आणि काडतुसे खोलीत ठेवली होती.

कसा झाला खुलासा?
पंजाब पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी शूटर कपिल पंडितला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान सलमानच्या हत्येचा खुलासा केला आणि संपूर्ण कटाची माहिती दिली.

लॉरेन्सने २०१८ मध्ये पहिल्यांदा दिली धमकी
लॉरेन्सने २०१८ मध्ये जोधपूर कोर्टातील सुनावणीदरम्यान सलमानला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सलमान केवळ दोनदा जोधपूरच्या कोर्टात आला होता. दोन्ही वेळेस त्याची सुरक्षा कडेकोट ठेवण्यात आली होती. अलीकडेच सलमान खानच्या वकिलालाही धमकीचे पत्र आले होते. असेच पत्र त्याचे वडील सलीम खान यांनाही मिळाले होते.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या