नवी दिल्ली : भाजपाचे नेते अभिनेता परेश रावल यांची नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी परेश रावल यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एनएसडीच्या अध्यक्षपदी परेश रावल यांची नियुक्ती केली. सध्या या पदावर राजस्थानी कवि अर्जुन चरण हे कार्यरत असून लवकरच परेश रावल पदभार स्विकारतील. चरण हे 2018 मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देत, परेश रावल यांचं अभिनंदन केलंय. प्रसिद्ध कलाकार परेश रावल यांची महामहीम राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी एनएसडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. रावल यांच्या प्रतिभावान व अनुभवाचा लाभ देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना मिळेल. हार्दीक अभिनंदन… असे ट्विट प्रल्हाद सिंह पटेल यांनी केलंय.
कंगना वादात आता राज्यपालांची उडी