36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमनोरंजनआता धावत्या रेल्वेत प्रवासी बोर होणार नाहीत

आता धावत्या रेल्वेत प्रवासी बोर होणार नाहीत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी एख खास नवी सुविधा मिळणार आहे. रेल्वे पीएसयू रेलटेलच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये बहुप्रतिक्षित अशा कंन्टेंट ऑन डिमांड सेवा या महिनापासूनच सुरु केली जाणार आहे. या सुविधेनुसार प्रवाशांना रेल्वेत प्रिलोडेड मिल्टीलिंग्वल कंटेट उपल्बध करुन दिला जाईल. त्यात चित्रपट, बातम्या, म्युधिक व्हिडीओ आणि जनरल एन्टरटेन्मेंटचा सहभाग असेल.

रेलटेलचे सीएमडी पुनीत पुनावाला यांनी सांगितले की, बफर फ्री सेवा निश्चित करण्यासाठी मीडिया सर्व्हर रेल्वेच्या डब्यात ठेवले जाईल. प्रवासी धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाईसमध्ये हाय क्वालिटी असणारे बफर फ्री स्ट्रिमिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे वेळोवेळी यातील कंटेन्ट अपडेट होत राहील.

कोणत्या स्टेशनांपासून सेवेला सुरुवात?
रेल्वेही सुविधा ५ हजार ७२३ उपनगरी रेल्वे आणि ५ हजार ९५२ वाय-फाय असणा-या रेल्वे स्थानकांसह ८ हजार ७३१ रेल्वे गाड्यांमध्ये चालू केली जाणार आहे. एक राजधानी एक्सप्रेस आणि एका पश्चिम रेल्वेतील एसी उपनगरीय रेकमध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात आणि परीक्षणाच्या तयारीत आहे. रेल्वे आणि रेलटेलमध्ये यातून मिळणा-या लाभ विभागून ५० – ५० टक्के घेतला जाणार आहे. त्यात पीएसयूला या सुविधेतून कमीतकमी ६० कोटी रुपयांचे वार्षिक उप्तन्न मिळणार आहे.

रेलटेलने रेल्वे आणि रेल्वे स्थानकावर सुविधा प्रदान करण्यासाठी झी एन्टरटेन्मेंटची सहाय्यक कंपनी मार्गो नेटवर्क्ससोबत भागिदारी केली आहे. यी योजना दोन वर्षात कार्यान्वित केली जाणार आहे. यातील कंटेन्ट पेड आणि अनपेड फॉरमॅटमध्ये १० वर्षांसाठी करार करण्यात आला आहे.

देशात लस मिळेना, विदेशात विक्री कशी?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या