मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या पठाणची क्रेझ जगभरात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणा-या या सिनेमाने चार दिवसांत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
रिलीजच्या चौथ्या दिवशी हा सिनेमा ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. भारतीय सिनेप्रेक्षकांप्रमाणे परदेशातील शाहरुखच्या चाहत्यांचे पाऊलही पठाण सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहाकडे वळत आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी परदेशात या सिनेमाने ४९ कोटींची कमाई केली.