26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमनोरंजनपोलिस करताहेत सुशांतच्या अर्थिक व्यवहारांचाही तपास

पोलिस करताहेत सुशांतच्या अर्थिक व्यवहारांचाही तपास

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने नैराश्यातून आत्महत्या केली. हे नैराश्य चित्रपट नाकारल्यामुळे आल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. त्यामुळे त्याने 2012 पासून कोणते चित्रपट साइन केले आणि त्यातील कोणत्या चित्रपटांचे करार रद्द झाले याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणी यशराज फिल्म्सचे दोन बडे अधिकारी आशीष सिंह आणि आशीष पाटील यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी त्यावेळी यशराज फिल्म्सच्या निर्मितीचे काम पाहत होते.

सुशांतने साइन केलेल्या चित्रपटाच्या कराराची प्रत पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र करार नेमका का रद्द झाला याची प्रत्य त्यांच्याकडे नाही. यशराज फिल्मशी निगडित या अधिकाऱयांना चित्रपट साइनिंग विषयीच्या अटी आणि शर्थींबाबतच प्रश्नोत्तरे करण्यात आली होती. यशराज फिल्मचे दिग्दर्शक शानू शर्मा यांनाही शनिवारी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. शानू यांनीच सुशांतला साइन केले होते. त्यामुळे त्यांच्याकडे काही कागदपत्रेही मागण्यात आली होती.

यशराज फिल्म्सकडून सुशांत सोबत झालेल्या करारांची प्रत मागील आठवडय़ात देण्यात आली होती. यामध्ये तीन चित्रपटांचा समावेश होता ‘शुद्ध देसी रोमांस’, ‘ब्योमकेश बक्शी’ हे दोन चित्रपट तयार झाले होते तर तिसरा चित्रपट ‘पानी’ची निर्मिती काही होऊ शकली नाही. सर्वसाधारणतः यशराजकडून तीन चित्रपटांसाठी कलाकारांना साइन केले जात असल्याचे समजते. पानी हा चित्रपट 150 कोटी इतके बजेट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सांगितल्याने फिस्कटल्याचे कळते. सुशांतने ज्यांच्यासोबत चित्रपट साइन केले आहेत अशा यशराज फिल्मस्प्रमाणेच अन्य चित्रपट निर्मात्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांचे एक पथक सुशांतच्या अर्थिक व्यवहारांचाही तपास करीत आहे.

Read More  लातूर शहरातील पाच नगरांचे केले निर्जंतुकीकरण

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या