नवी दिल्ली : प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका रिहानाने तिच्या चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. रिहाना आणि तिचा पती रॅपर असॅप रॉकी यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सुपर बाऊल इव्हेंटमध्ये परफॉर्मन्स करताना रिहानानं बेबी बंप फ्लॉन्ट केला होता. तेव्हा पासूनच रिहानाच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. आता रिहानाच्या रिप्रेजेंटेटिवनं रिहानाच्या प्रेग्नन्सीची माहिती दिली आहे.
रिहानानं २०२२ मे महिन्यामध्ये मुलाला जन्म दिला. आता रिहाना दुस-यांदा आई होणार आहे. पहिल्या प्रेग्नन्सी दरम्यान रिहानाने रिव्हिलींग फोटोशूट देखील केले होते. या फोटोशूटमध्ये तिने बेबी बंप फ्लॉन्ट केले होते.. रिहानाच्या ‘वेअर हॅव यू बीनस डायमंड्स’, ‘वी फाऊंड लव्ह’, ‘अम्ब्रेला आणि रन थिस टाऊन’ या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
सुपर बाऊल हा इव्हेंट अमेरिकेमधील सर्वात मोठ्या फुटबॉल इव्हेंटपैकी एक आहे. या इव्हेंटमध्ये प्रसिद्ध गायक परफॉर्म करतात. सुपर बाऊल इव्हेंटमधून रिहानानं कमबॅक केलं. कारण २०१८ नंतर रिहानानं कोणताही लाईव्ह परफॉर्मन्स केला नव्हता. तिच्या या इव्हेंटमधील धमाकेदार एन्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
रूड बॉय, डायमंड्स या गाण्यांवर रिहाना यांनी परफॉर्म केलं. रिहानाचा गेल्या सात वर्षात एकही अल्बम रिलीज झाला नाही. रिहानाच्या आगामी अल्बम्सची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. रिहानाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तिच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.