23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमनोरंजन‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्राजक्ताने घेतला ब्रेक

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्राजक्ताने घेतला ब्रेक

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या धम्माल कॉमेडी शोला ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमातून प्राजक्ता माळीने नुकताच ब्रेक घेतला आहे. यामागचं कारणही तिने सांगितले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील विनोदवीरांची कॉमेडी प्रेक्षकांना जितकी आवडते, तितकेच प्राजक्ता माळीचे सूत्रसंचालन.

विनोदवीरांच्या धम्माल पंचवर ‘व्वा दादा व्वा’ म्हणत तिने दिलेली दाद असो किंवा मग तिचे खळखळून हसणे असो सगळ्यांवर प्रेक्षक फिदा आहेत.

प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिच्यासोबत संकर्षण क-हाडेही दिसत आहे. संकर्षणबरोबर सेल्फी शेअर करत तिने म्हटले की, माझ्या मित्रासह लंडनला जाण्यासाठी तयार.

या फोटोमध्ये संकर्षणसह प्राजक्ता फारच खूश दिसत आहे.काही कामानिमित्त प्राजक्ता आणि संकर्षण दोघंही लंडनला गेले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे काही दिवस बहुतेक प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये दिसणार नसल्याची चर्चा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या