मुंबई : प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी त्यांच्या नाटकाच्या रिओपनिंगचा प्रयोग रद्द झाला आहे. दामले यांना डॉक्टरांनी किमान सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.लॉकडाउननंतर पहिल्यांदाच दागमले यांच्या एका नाटकाचा प्रयोग १२ डिसेंबरला पुण्यात झाला होता.
प्रयोग संपल्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांना थोडीशी कणकण जाणवत होती. यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. फेसबुकवर प्रशांत दामले यांनी एक व्हिडिओ शेअर करून यासंबंधीची सविस्तर माहिती दिली.
हाथरस पीडितेची सामूहिक बलात्कार करुन हत्याच