Saturday, September 23, 2023

प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे : अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी प्रिया बेर्डे यांचे चिरंजीव अभिनय हे देखील उपस्थित होते. प्रिया बेर्डे म्हणाल्या, “मला कलाकारांबद्दल तळमळ वाटतेय. कलाकार तंत्रज्ञानसाठी काम करायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादीचं पाठबळ मिळत असले तर निश्चित काम करायला आवडेल” अभिनेत्री की, नेता या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “मी स्वत:ला कधीही नेता म्हणवणार नाही. मीच नाही, माया जाधव आम्ही सगळेच मिळून एकत्र काम करणार आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच निवड का केली? असे विचारल्यावर “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कलेची जाण आहे, कलाकारांची कदर आहे. त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. त्यांनी कला, नाटय क्षेत्रातील अनेकांना मदतीचा हात दिला आहे” असे प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. “विधानपरिषद निवडणुकीचा विचारही माझ्या डोक्यात नाही. मला तळागाळातून काम करायचं आहे. तालुका जिल्ह्यांमध्ये फिरायचं आहे. लोककलावंत, तमाशा कलावंतांचे समस्या जाणून घ्यायच्या आहेत” असे प्रिया बेर्डे यांनी स्प्ष्ट केले.

याकार्यक्रमात सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह राजेश सरकटे (गायक) , सुधीर निकम (लेखक,दिग्दर्शक), जितेंद्र जादुगार , सुवासिनी देशपांडे (अभिनेत्री ), शंकुतला नगरकर (लावणी कलावंत), सिध्देश्वर झाडबुके (सिने अभिनेता), विनोद खेडकर (सिनेअभिनेता), संतोष साखरे (कार्यकारी निर्माता) मिलिंद अष्टेकर( माजी उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ,कोल्हापूर), आशू वाडेकर(अभिनेता), संग्राम सरदेशुख (सिनेअभिनेता), उमेश दामले (सिने अभिनेते ),संजय डोळे (लेखक/दिग्दर्शक) ,ओंकार केळकर (संगीतकार) आदी कलाकारांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Read More  कोरोनाच्या संकटात उन्हानंतर आता भरपावसात पोलिसांचे कर्तव्य !

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या