24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमनोरंजनप्रियांका लेकीसोबत घेतेय सुटीचा आनंद

प्रियांका लेकीसोबत घेतेय सुटीचा आनंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने काही महिन्यांपूर्वी सरोगसीद्वारे एका गोंडस लेकीला जन्म दिला आहे. ती सतत आपल्या लेकीसोबत खास वेळ घालवत असते. प्रियांका चोप्रा सध्या आपली मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत न्यूयॉर्कमध्ये आहे.

प्रियांकाने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलीसोबतचे दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. प्रियांकाची लेक मालतीसोबत ही पहिलीच ट्रीप होती. या फोटोंमध्ये मालती प्रियांकाच्या मांडीवर खिडकीजवळ बसलेली दिसत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस काही महिन्यांपूर्वी सरोगसीद्वारे आई-बाबा बनले आहेत. त्यांची लेक जन्मत:च प्रचंड अशक्त होती. त्यामुळे तिला जन्मानंतर तब्बल एक महिना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले होते. त्यामुळे ती फारच अशक्त दिसून येत होती. सध्या ती एकदम उत्तम आहे. प्रियांका आणि निकने आपल्या या लेकीचे नाव मालती मेरी असे ठेवले आहे. सध्या प्रियांका आपल्या लेकीसोबत आपल्या पहिल्या ट्रीपचा मनसोक्त आनंद घेत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

हा फोटो शेअर करताना प्रियांकाने सांगितले आहे की हा तिच्या लेकीचा पहिला प्रवास आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘माझ्या डोळ्यातील ता-याचा पहिला प्रवास’यावरूनच स्पष्ट होते की मालतीने पहिल्यांदाच प्रवास केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या