मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रियंका चोप्रा गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. मालती मेरी जोनास असे तिच्या लाडक्या लेकीचे नाव आहे. वर्षभर प्रियांकाने लेकीचा चेहरा मीडियाला दिसणार नाही, याची काळजी घेतली. आता वर्षभरानंतर तिने मालतीचा चेहरा सगळ्यांना दाखवला आहे.
प्रियंकाच्या लेकीचा चेहरा दिसत असलेला पहिला फोटो समोर आला आहे. चिमुकल्या मालतीचे आई प्रियंकासोबत खेळत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी मालती ही हुबेहूब वडील निक जोनससारखी दिसत असल्याचे म्हटले आहे.
प्रियंका चोप्राची मुलगी मालती मेरीचा फर्स्ट लूक समोर आला आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे प्रियंकाने मुलीचा चेहरा कॅमे-यापासून लपवण्याचा प्रयत्न केला नाही.
प्रियंका चोप्राने नुकतीच एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी जोनस ब्रदर्स, निक जोनस हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी प्रियंका ही मालतीला हातात घेऊन पहिल्या रांगेत बसलेली पाहायला मिळाली. या कार्यक्रमाचे अनेक फोटो समोर आले असून यात मालती प्रियंकाच्या मांडीवर खेळताना दिसत आहे.