नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राची मुलगी मालती हिचे फोटो आणि चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
प्रियांका चोप्राची मुलगी आता सहा महिन्यांची झाली आहे. प्रियांकाने तिचा ४०वा वाढदिवस तसेच मालतीचा ६ महिन्यांचा वाढदिवस साजरा केला आहे, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह टाकले आहेत.
समोर आलेल्या या फोटोमध्ये प्रियांका आणि निक त्यांच्या मुलीसोबत दिसत आहेत. तर दुसरीकडे मालती क्यूट फ्रॉकमध्ये दिसत असून तिच्या ड्रेसवर ‘६ महिने’ असे लिहिले आहे. यासोबतच मालतीसाठी आणलेला खास केकही फ्रेममध्ये पाहायला मिळत आहे. सर्वजण मालतीचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. प्रियांका चोप्राने यावेळी आपल्या मुलीच्या चेह-यावर हार्ट ईमोजी शेअर केले आहे. आणि मुलीचा चेहरा लपवला आहे.
प्रियांकाने आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत आणि लांब पोस्टमध्ये सर्वांचे आभार मानले आहेत. प्रियांकाने निकचे विशेष आभार मानले कारण निकनेच प्रियांकासाठी हे सर्व आयोजित केले होते. प्रियंका चोप्राने १८जुलै रोजी तिचा ४० वा वाढदिवस साजरा केला.
या खास प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र एकत्र आले. प्रियांकाचा हा वाढदिवसही खास होता कारण ती पहिल्यांदाच तिची मुलगी मालती मेरीसोबत सेलिब्रेट करत होती. प्रियांकाने बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक फोटो पोस्ट केले पण तिने तिच्या मुलीसोबतचा एकही फोटो शेअर केला नाही. दरम्यान, तिची जिवलग मैत्रीण तमन्ना दत्तची एक पोस्ट समोर आली आहे ज्यामध्ये प्रियांकाच्या मांडीवर मुलगी मालती दिसत आहे.