22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमनोरंजनपुनित राजकुमारचा शेवटचा चित्रपट २८ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

पुनित राजकुमारचा शेवटचा चित्रपट २८ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

एकमत ऑनलाईन

चेन्नई : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता पुनित राजकुमारचे मागील वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४६ व्या वर्षी त्याने जगाला अलविदा केला.
त्याच्या जाण्याने चाहत्यांनी आणि एकंदरीत चित्रपट जगताने हळहळ व्यक्त केली. निधनापूर्वी पुनित राजकुमारने एक चित्रपट केला होता आणि तो प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली.

आता त्यांच्या पत्नी आर्श्विनी पुनित कुमार यांनी ट्विटर आणि इतर समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकत त्यांच्या नव्या चित्रपटाच्या ‘गंधा गुडी’ च्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. पुनित राजकुमार यांचा हा चित्रपट त्यांच्या पुण्यतिथीच्या एक दिवस म्हणजे २८ ऑक्टोबरला सर्वत्र चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

आर्श्विनी पुनित कुमार यांनी चित्रपटाचे पोस्टर टाकत लिहिले की, अप्पूचा शेवटचा चित्रपट, ज्यात तो स्वत: कर्नाटकाचे सुंदर जग दाखविणार आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर खूप प्रेम केले, त्यासाठी त्याच्या चाहत्यांंसाठी ही प्रेमपूर्ण भेट. हा चित्रपट येत्या २८ ऑक्टोबरला सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या