18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमनोरंजनराज ठाकरेंमुळे मिळाली शिवाजी महाराजांची भूमिका

राज ठाकरेंमुळे मिळाली शिवाजी महाराजांची भूमिका

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘वेडात मराठे वीर दौडले सात… ’या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला आहे. मांजरेकर यांच्या या प्रोजेक्टची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती.

या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी त्याने प्रतिक्रिया दिली आहे. जी चर्चेत आली आहे. आपल्याला ही भूमिका राज ठाकरें मुळे मिळाली हे सांगताना अक्षय भावूक झाला होता. त्याने प्रांजळ कबूली देत चाहत्यांना त्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात.. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा काल पार पडला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतात, अक्षय म्हणाला की, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. शिवरायांची ही भूमिका राज ठाकरे यांच्यामुळे मला मिळाली. ही भूमिका तू करु शकतोस. असं मला राज म्हणाले होते. असं अक्षयनं यावेळी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या