34.4 C
Latur
Sunday, April 2, 2023
Homeमनोरंजनरजनीकांत पोहोचले ‘मातोश्री’वर

रजनीकांत पोहोचले ‘मातोश्री’वर

एकमत ऑनलाईन

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत सध्या मुंबईमध्ये आहेत. काल वानखेडे स्टेडियममध्ये बसून मॅच पाहिल्यानंतर आता रजनीकांत ‘मातोश्री’वर पोहोचले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली आहे.

सुपरस्टार थलायवा अभिनेता रजनीकांत उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर आले आहेत. ही कोणतीही राजकीय भेट नाही. तर रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत, त्यामुळे ते ‘मातोश्री’वर आले आहेत. रजनीकांत यांचे ठाकरे कुटुंबीयांशी कौटुंबिक नातेसंबंध आहेत. त्यामुळे ही भेट होत आहे.

सुपरस्टार रजनीकांत मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना पाहायला आले होते. बीसीसीआयकडून त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी त्यांचे स्वागत केले.

अमोल काळे म्हणाले, रजनीकांत यांच्या उपस्थितीमुळे भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढेल. कारण संघातील अनेक खेळाडू त्यांचे चाहते आहेत. तसेच प्रेक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या