22.2 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home मनोरंजन 'रजनीकांत' यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

‘रजनीकांत’ यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांच्या प्रकृती बाबत एकचिंताजनक बातमी समोर आली आहे. आगामी अन्नाथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री नयनतारा आणि रजनीकांत हे हैदराबादमध्ये होते. त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही केली, मात्र शूटिंगच्या क्रूमधील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं.

दरम्यान, रजनीकांत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने आज सकाळी ते हैद्राबातमधील अपोलो रुग्णालयात दाखल झाले. मात्र रजनीकांत यांना उच्च रक्तादाबाशिवाय इतर कोणता ही त्रास नसल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रजनीकांत यांच्या मोठा चाहता वर्ग असून, रजनीकांत लवकर बरे व्हावेत म्हणून चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. 22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. त्या दिवसापासून त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं होतं.

रजनीकांत यांचा जन्म एका महाराष्ट्रीयन कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आई जीजाबाई गायकवाड आहे. गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी रजनीकांत सर्वात लहान. रजनीकांत हे तुमच्या आमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहेत. पण तमिळनाडूमध्ये त्यांना देवाचा दर्जा मिळाला आहे. आपल्या जादुई अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं आहे.

लातूर मनपाच्या हक्काचे जीएसटीचे पैसे मार्चच्या अगोदर मिळवून देणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या