23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमनोरंजन१५ दिवसानंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर

१५ दिवसानंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर

एकमत ऑनलाईन

मुंबई : विनोदाचा बादशाह असलेला राजू श्रीवास्तव गेल्या १५ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहे. बरोबर १५ दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव हा जीममध्ये व्यायाम करीत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला बेशुद्ध अवस्थेत त्यांना तात्काळ दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आले.

तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून त्याच्या चाहत्यांनी देव पाण्यात ठेऊन त्याच्यासाठी प्रार्थना केली होती. अखेर १५ दिवसानंतर तो शुद्धीवर आला असून त्याने उच्चारलेल्या ५ शब्दाने कुटुंबियांना तर दिलासा मिळाला आहेच पण जगभरातील त्याच्या फॅन्सची प्रार्थना आता कामी आली अशीच भावना प्रत्येकाची आहे.

गेल्या १५ दिवसांपासून राजू श्रीवास्तव याच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत त्याच्या तब्येतीवरुन वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या शिवाय उपचाराला प्रतिसाद नसल्याने त्याचे कुटुंबीय आणि फॅन्स हेचिंतेत होते.

मात्र, शुद्धीवर येताच त्यांनी आपल्या पत्नीला जे पाच शब्द बोलले आहेत त्यामुळे आता सर्वकाही सुरळीत होईल असे चित्र आहे. त्यांनी आपल्या पत्नीला जवळ घेऊन मी ठीक आहे..असे म्हणताच त्याच्या कुटुंबियांचा आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा आनंद गगणात मावेना झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या