16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमनोरंजनराखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री

राखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत ही सतत चर्चेत असते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात येत असते. सोशल मीडियावर राखीचे अनेक फनी व्हीडीओ, रस्त्यावरचा डान्स, वादग्रस्त वक्तव्ये व्हायरल होत असतात. अशातच राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता राखीचा एक व्हीडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने मुख्यमंत्री होण्याचे तिचे स्वप्न सांगितले आहे. राखीचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राखी सावंतने व्हीडीओमध्ये म्हटले आहे की, तिला मुख्यमंत्री केले तर काय करायला आवडेल. जर मला या देशाची मुख्यमंत्री बनवले तर मी ड्रीम गर्ल हेमा मालिनीजींचे गोरे गाल आणि गोरी कंबरसारखे रस्ते बनवेल. आमच्या ड्रीमगर्लसारखे रस्ते मी सुंदर बनवीन. हेमा मालिनीजींचे सौंदर्य, त्यांचा चेहरा, त्यांचे शरीर, कंबर अशा खड्ड्यांपुढे मी जाणार नाही. तुम्ही हे विनोदामध्ये घेऊ नका.

राखी पुढे म्हणाली की, चहा बनवताना मोदीजी पंतप्रधान झाले, तर बसून, पडून, हसत असताना मी मुख्यमंत्री का होऊ शकत नाही.. सध्या राखीचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस’मुळे राखी चांगलीच प्रकाशझोतात आलेली पहायला मिळाली. राखीचा नुकताच घटस्फोट झाला असून सध्या सोशल मीडियावर याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच राखीचा नवा बॉयफ्रेंड आदिल खान याच्यासोबत लग्नाच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या