25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home मनोरंजन राम गोपाल वर्मा यांनी केली 'गांधी-गोडसे' यांच्यावरील चित्रपटाची घोषणा

राम गोपाल वर्मा यांनी केली ‘गांधी-गोडसे’ यांच्यावरील चित्रपटाची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, वृतसंस्था : लॉकडाऊन दरम्यान थिएटर बंद असताना राम गोपाल वर्मा यांनी आपले आरजीव्ही वर्ल्ड थिएटर ऑनलाईन प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. या प्लॅटफॉर्मवर ते एकामागून एका चित्रपटांची घोषणा करत आहे. यातील एक चित्रपट गांधी आणि गोडसेवर आधारित असून, ज्यावरून घोषणेसोबतच वाद सुरू झाला आहे. ‘द मॅन हू किल गांधी …’ असे या चित्रपटाचे नाव असून याच्या फर्स्ट लूक पोस्टरवर वर्मा यांनी गोडसे आणि गांधी यांचे चेहरे विलीन झाल्याचे दाखवले आहे. वर्मा यांनी त्यामागील आपली कल्पना सांगत असताना लिहिले – हे चित्र एकमेकांत सामायिक करण्याचा हेतू हे दाखवणे आहे कि, गोडसे यांनी गांधींची हत्या करुन स्वत: ला मारले.

अपेक्षेप्रमाणे चित्रपटाच्या पोस्टरवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एका वापरकर्त्याने या पोस्टरवर आक्षेप घेत हे दुखद असल्याचे म्हंटले आहे. महात्मा गांधी आणि गोडसे यांची छायाचित्रे विलीन करणे चुकीचे असल्याचे वापरकर्त्याने म्हटले आहे. त्याला उत्तर म्हणून राम गोपाल वर्मा यांनी स्पष्टीकरण दिले- हा चित्रपट पूर्ण झाल्यावर मॉर्फिंगचा हेतू समजेल. आणि तुमच्याप्रमाणेच मलाही माझ्या कलात्मक आवड दर्शविण्याचा अधिकार आहे. अंतिम उत्पादन न पाहता निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य नाही.

Read More  ‘कोरोना’वर लस : अमेरिकन कंपनीसोबत करार, 50 कोटी ‘डोस’ तयार करण्याचं ‘लक्ष्य’

दुसर्‍या चित्रपटासाठी वर्मा यांनी फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर केले आहे, जे फारच इंटरेस्टिंग आहे. या पोस्टरमध्ये चार तरुण बसलेले आहेत, जे अंमली पदार्थांचे सेवन करत आहेत आणि भिंतीवरील कतरिना कैफचे छायाचित्र पहात आहेत. ‘किडण्यापिंग ऑफ कॅटरिना कैफ’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यासोबत वर्मा यांनी लिहिले कि, सिनेमागृहे विसरा, सिनेमाचे भविष्य ओटीटी नाही तर ते खासगी अ‍ॅप्सपुरतेच मर्यादित राहील.

अलीकडेच वर्मा यांनी एका अडल्ट चित्रपटाद्वारे आरजीव्ही वर्ल्ड थिएटर सुरू केले. या यशानंतर वर्मा यांना आपली कारकीर्द नव्याने उड्डाण घेताना दिसत आहे. रामगोपाल वर्मा यांनी याबद्दल लिहिले कि- माझ्या वैयक्तिक व्यासपीठाच्या प्रचंड यशानंतर, मला वाटते की क्लायमॅक्स ही माझ्या कारकीर्दीची सुरुवात आहे. मी आरजीव्ही वर्ल्ड थिएटरमध्ये कोणत्या प्रकारचे पाथब्रेकिंग कंटेंट टाकत आहे, ते पाहतच रहा. दरम्यान, वर्मा यांनी कोरोना विषाणूबद्दलही एक चित्रपट बनविला होता, जो आपल्या थीममुळे प्रसिद्ध होता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या