24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनरणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ने केला १०० कोटींचा टप्पा पार

रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ने केला १०० कोटींचा टप्पा पार

एकमत ऑनलाईन

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

या चित्रपटाचे शो हे हाऊसफुल झाले आहेत. या चित्रपटानं केवळ देशभरातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होऊन केवळ तीन दिवस झाले आहेत. तीन दिवसांमध्ये या चित्रपटानं १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटी क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे.

बह्मास्त्र चित्रपटाने पहिल्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली. तर दुस-या दिवशी या चित्रपटानं ४२ कोटींची कमाई केली. यामध्ये ३७ कोटी ंिहदी भाषेतील आणि ५ कोटी इतर भाषांतील कलेक्शन आहे. तिस-या दिवशी ४६ कोटींचे कलेक्शन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केले. तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने १२५ कोटींची कमाई केली.

अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ब्रह्मास्त्र चित्रपटाचं कौतुक करत आहेत. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं १६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या