मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान आणि करिश्मा कपूर यांच्या आई-वडिलांच्या नात्यातील दुरावा कायमचा दूर झाला आहे आणि आता ते एकत्र राहू लागले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर व अभिनेत्री बबिता यांचे लव्ह मॅरेज आहे. ते दोघे मागच्या ३५ वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. परंतु आता मात्र दोघेही एकत्र आले आहेत.
रणधीर कपूर आणि बबिता यांनी १९७१ मध्ये लग्न केले आणि नंतर १९८८ मध्ये ते विभक्त झाले होते. आता तब्बल ३५ वर्षांनी ते पुन्हा एकत्र आले आहेत. इतके दिवस दूर राहूनही त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता.
आता पुन्हा एकत्र राहण्याच्या त्यांच्या निर्णयाने केवळ कुटुंबीय आणि नातेवाईकच खुश नाहीत तर त्यांचे चाहतेही खुश झाले आहेत. मीडिया रिपोर्टस्नुसार, बबिता सर्व सामान घेऊन रणधीर यांच्या वांद्रे येथील नवीन घरात राहण्यासाठी गेल्या आहेत.
आई-वडील एकत्र राहणार असल्यामुळे त्यांच्या मुली करीना आणि करिश्माही आनंदी आहेत. कारण आता उतारवयात दोघंही एकत्र राहतील आणि एकमेकांची काळजी घेतील. प्रेमविवाह असूनही लग्नानंतरही ते मतभेदांमुळे वेगळे राहिले होते. अशा परिस्थितीत ३५ वर्षांनंतर त्यांचे पुन्हा एकत्र येणे ही मोठी बाब आहे.
रणधीर कपूर यांची तब्येत आता फार चांगली नसते, त्यामुळे बबिता त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांची व्यवस्थित काळजी घेता येईल. ऐंशीच्या दशकात रणधीर कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकत नव्हते. त्यांचा कारकीर्दीचा आलेख खाली घसरत होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ होऊ लागले आणि दारू पिण्यास सुरुवात केली. त्यांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे बबिता यांनाही त्रास होऊ लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाले होते