27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमनोरंजनरणवीर झाला शाहरुख-सलमानचा शेजारी

रणवीर झाला शाहरुख-सलमानचा शेजारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘ऑल टाईम एनर्जेटिक’ म्हणून ओळख असलेला अभिनेता म्हणजेच रणवीर सिंह. रणवीर सिह त्याच्या चित्रपटातील हटके भूमिका, अतरंगी स्टाईल, रंगबेरंगी कपड्यांमुळे चर्चेत असतो. रणवीरपुन्हा एकदा चर्चेत आला असून तो यावेळी कोणत्या चित्रपटामुळे किंवा त्याच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत आला नाही. सध्या रणबीर एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे.

रणवीर सिंहने नुकतेच मुंबईमध्ये एक घर खरेदी केले आहे . यामुळे सध्या तो चर्चेत आहे. बॉलिवूड कलाकार एकापेक्षा एक भव्य घरे खरेदी करताना दिसतात. त्यांची किंमतही तितकीच मोठी असते. अशातच मुंबईमधील वांद्रे येथे रणवीरने करोडो रुपयांचे एक मोठे आलिशान अपार्टमेंट खरेदी केलंय. हे अपार्टमेंट खरेदी करुन रणवीर आता शाहरुख खान आणि सलमान खानचा शेजारी बनला आहे.

रणवीरनं शाहरुचे घर ‘मन्नत’ आणि सलमानचं ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’च्या मधोमध भव्य अपार्टमेंट खरेदी केलं असून तेथून सी-व् ूव्ह पहायला मिळतो.
रणवीरने ‘ओह फाइव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी‘ या फर्मद्वारे घर विकत घेतलं आहे, ज्यामध्ये रणवीर सिंह आणि त्याचे वडील दिग्दर्शक आहेत.

रणवीरने खरेदी केलेल्या सी फेसिंग हाऊसची किंमत ११९ कोटी रुपये आहे. रणवीरने खरेदी केलेलं घर इमारतीच्या १६ व्या , १७ व्या, १८ व्या फ्लोअरवर पसरलेले आहे. यामध्ये १९ पार्किंग स्लॉट आहेत. अपार्टमेंटमध्ये एकूण ११,२६६ स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आणि १,३०० स्क्वेअर फूट एक्सक्लुझिव्ह टेरेस आहे. नव्या सीव् ू बंगल्याची स्टँप ड्यूटीच ७.१३ कोटी भरली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या