24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनरणवीरची दोन तास चौकशी

रणवीरची दोन तास चौकशी

एकमत ऑनलाईन

मुंबई : रणवीर सिंहच्या न्युड फोटोशुटने मोठी खळबळ उडवून दिली होती. त्याच्यानंतर रणवीरवर गुन्हेही दाखल झाले होते. त्याच्या चाहत्यांना काळजी होती की, त्याला अटक होणार की काय… या सगळ्यात पोलिसांनी रणवीरला पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्याचा जवाब नोंदवून घेतला आहे. यावेळी रणवीरचे वकीलही त्याच्यासोबत असल्याचे दिसून आले आहे. चेंबूर पोलिसांनी रणवीर सिंह याचा जबाब नोंदवला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन तास हा जवाब नोंदवून घेण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी रणवीरचा जबाब नोंदवून घेतला असून त्यात रणवीरने पोलिसांना आवश्यक त्या सर्वच गोष्टींमध्ये सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी ज्या कंपनीसोबत फोटोशूट केलं त्याच्या करारा विषयी रणवीरने माहिती दिली आहे. रणवीर हा आज सकाळी ७ वाजता संबंधित पोलीस स्टेशनला हजर झाला.

चौकशीनंतर त्याचा जवाब नोंदवण्यात आला आहे. बोल्ड फोटोशुट प्रकरणी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियावर देखील त्याच्या त्या न्युड फोटोची चर्चा होती. काही सामाजिक संस्थांनी देखील त्याची नोंद घेऊन त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या