मुंबई : रविवारी मुंबईत पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात तिने हजेरी लावली होती. ‘ताल केडेम ब्रायडल काऊचर’ या ब्रँडचा ब्लॅक आऊटफिट तिने परिधान केला होता. या शॉर्ट ऑफ शोल्डर ड्रेसला मागे मोठा ट्रेल लावण्यात आला आहे.
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा मुंबईतील एका कार्यक्रमात अत्यंत वेगळा लूक पहायला मिळाला. या कार्यक्रमात तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. मात्र या शॉर्ट ड्रेसमुळेच तिला नेटक-यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.
रविवारी मुंबईत पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात तिने हजेरी लावली होती. ‘ताल केडेम ब्रायडल काऊचर’ या ब्रँडचा ब्लॅक आऊटफिट तिने परिधान केला होता. या शॉर्ट ऑफ शोल्डर ड्रेसला मागे मोठा ट्रेल लावण्यात आला आहे. त्यावर मेसी बन आणि हाय हिल्स असा तिचा लूक होता.
काहींनी रश्मिकाच्या या ड्रेसची तुलना उर्फी जावेदच्या फॅशनशी केली आहे. तर ‘जेव्हापासून ही बॉलिवूडमध्ये आली आहे, तेव्हापासून तिचा ड्रेसिंग सेन्स उर्फी जावेदसारखा होऊ लागला आहे’, असे दुस-याने लिहिले आहे. पडद्याच्या कापडाने अत्यंत वाईट ड्रेस शिवला आहे, अशीही टीका नेटक-यांनी केली.