मुंबई : रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा आहेत. या सगळ्यामध्ये तिचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये रश्मिका तिच्या फॅन्सला प्रपोज करताना दिसत आहे.
साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदाना ही खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपला वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता बॉलिवूडमध्येही एकापाठोपाठ एक चित्रपटांमध्ये झळकत आहे. त्याचबरोबर प्रोफेशनल लाईफसोबतच रश्मिकाचे पर्सनल लाईफ देखील चर्चेत असते.
‘पुष्पा’फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना चुकून एका चाहत्याला प्रपोज करतानाचा व्हीडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये एक चाहता अभिनेत्रीला विचारतो की तेलुगूमध्ये मुलीला प्रपोज कसे करायचे? हा प्रश्न ऐकून रश्मिका हसत हसत चाहत्यांना विचारते, ये हाय, क्या बात है … कोई है? यानंतर अभिनेत्री तेलुगूमध्ये मॅजिकल शब्द बोलताना दिसत आहे. यावर चाहत्याने ‘सेम टू यू’ असे उत्तर दिले. चाहत्याच्या या उत्तराने रश्मिका आश्चर्यचकित होते.