22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनपुन्हा ‘बॉलिवूड वाईफ’बनणे नामंजूर!

पुन्हा ‘बॉलिवूड वाईफ’बनणे नामंजूर!

एकमत ऑनलाईन

मुंबई : सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सचदेव यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. एका मुलाखतीमध्ये सीमाने मोठे वक्तव्य केले आहे, जे त्यांच्या कौटुंबिक नात्यावर आहे. सीमा म्हणते, गेल्या काही वर्षांपासून त्या घरामध्ये माझी घुसमट होत होती, जी आता मला थांबवायची आहे.

त्यामुळे सोहेलसोबत घटस्फोटाचा निर्णय घेत आहे. यापुढे बॉलिवूड वाईफ बनण्यात आपल्याला कोणताही रस नसल्याचे सीमाने म्हटले आहे. मला एक गोष्ट कळत नाही ती म्हणजे, पतीच्या नावावरूनच पत्नीला का ओळखले जावे, तिला स्वत:ची काही ओळख आहे की नाही, आपल्याकडे नेहमीच पितृसत्ताक दृष्टीने सा-या गोष्टी पाहिल्या जातात.

पुढे बोलताना ती म्हणाली, मला कोण काय म्हणतं याचा काहीही फरक पडत नाही. माझ्यावर त्या गोष्टींचा किती परिणाम होणार आहे हे मला जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकांनी आमच्या नात्यावर काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना काही सगळ्या गोष्टी माहिती नाहीत. आम्हाला त्यांना ते सांगायचेही नाही. स्वत:ला व्यक्त करताना ज्या संघर्षातून जावे लागले ते मांडण्याचा आपण प्रयत्न केल्याचे सीमाने म्हटले आहे.

सीमाने यापूर्वीच आपण काही झालं तरी सोहेलसोबत राहणार नसल्याचे सांगून चाहत्यांना धक्का दिला होता. अरबाजनंतर खान कुटुंबियांसाठी ही मोठी बातमी मानली जातेय. करण जोहर निर्मित ‘फॅब्युलस लाईव्ह्ज ऑफ बॉलिवूड’ नावाची मालिका ओटीटीवर रिलिज झाली आहे. त्याचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यातच सीमा आणि सोहेल खानच्या घटस्फोटाची बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या त्या मालिकेमध्ये सीमा सचदेह, महिप कपूर, नीलम कोठारी आणि भावना पांडे या सहभागी झाल्या आहेत. या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून सीमा आणि सोहेलच्या घटस्फोटाची चर्चा या मालिकेच्या निमित्ताने होत असल्याचे दिसून आले आहे. मालिकेच्या एका प्रसंगात सीमा तिच्या घराचे नाव बदलून सीमा सचदेव असे करते. जे पूर्वी सीमा खान असे होते. त्यावरून नेटक-यांनी अंदाज लावला आहे की, त्यांच्यात काही आलबेल नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या