27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमनोरंजनकोट्यवधींची फसवणुकीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अमिषा पटेलला दिलासा

कोट्यवधींची फसवणुकीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अमिषा पटेलला दिलासा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अभिनेत्री अमिषा पटेलला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अमिषावर फसवणूक आणि विश्वासघात केल्याचा आरोप आहे. झारखंडमधील कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी समन्स बजावले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने अमिषा पटेल विरुद्धच्या फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे.

अभिनेत्रीने ५ मे २०२२ रोजी याचिका दाखल केली होती, ज्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि पी.एस. नरसिंहा यांच्या पीठाने झारखंड सरकारला नोटीस बजावली आहे.

निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ (चेक बाऊन्स) अंतर्गत कारवाई कायद्यानुसारच केली जावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत म्हटले आहे. भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम ४०६ (गुन्हेगारी भंग) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत केवळ नोटीस जारी करा, असे न्यायालयाने म्हटले. पुढील आदेशापर्यंत, आयपीसीच्या कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत फौजदारी कारवाईला स्थगिती दिली जाईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या