मुंबई – कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी लावण्यात आलेले अमिताभ बच्चन यांचे होर्डिंग्स हटविण्यात आले आहेत. ‘जिस डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था, उसे कोरोना वायरस ने पकड लिया ‘अशा आशयाचे काही होर्डिंग्स उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात लावण्यात आले होते. मात्र यामुळे बिग बींच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्यामुळे हे होर्डिंग्स हटविण्यात आले आहे.
गावात बच्चन यांचे काही होर्डिंग्स लावण्यात आले होते. त्यामध्ये बिग बींच्या फोटोसोबत त्यांच्या ‘डॉन’ चित्रपटातील गाजलेला संवाद जनजागृती करण्याच्या उद्देशाने वापरण्यात आला होता. परंतु, त्याची शब्दरचना बदलण्यात आली होती. ज्यामुळे बिग बींच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचे म्हटले गेले होते. त्यानंतर हे होर्डिंग हटविण्यात आले.
जिस डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था, त्यालाच कोरोनाने विळख्यात ओढलेआहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी घरी रहा आणि विनाकारण घराबाहेर पडून डॉन होण्याचा प्रयत्न करु नका, असे होर्डिंग गावामध्ये लावण्यात आले होते. हे होर्डिंग जरी जनजागृतीसाठी असले, तरीदेखील बिग बींच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने आम्ही हा बॅनर डिझाइन केला होता. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांच्या भावनांचा आदर करत आम्ही ते बॅनर हटविले आहेत, असे लोहारा नगर पंचायत मुख्य अधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले आहे.
Read More विजयदुर्ग किल्ल्याच्च्या पडझडीची दखल : प्रधान सचिवांना दिल्या सूचना