21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमनोरंजनचित्रपट पाहण्यासाठी मुलांना येणार बंधने?

चित्रपट पाहण्यासाठी मुलांना येणार बंधने?

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्र सरकारने सिनेमेटोग्राफी विधेयकात काही दुरुस्ती केल्या आहेत. या दुरुस्तींमुळे लहान मुलांना त्यांच्या वयाचा दाखला दाखवल्याशिवाय सिनेमागृहांमध्ये चित्रपट पाहता येणार नाही. केंद्राच्या या निर्णयामुळे सध्या चित्रपट निर्माते त्रस्त आहेत. शिवाय सिनेमागृहांच्या मालकांनीदेखील या विरोधात आवाज उठवला आहे.

कुठलाही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनद्वारे मान्यता मिळवावी लागते. सीबीएफसीतर्फे चित्रपटांना त्यांच्या दर्जानुसार ग्रेड दिले जातात. परंतु या जुन्या पद्धतीत आता आणखी नवे बदल करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. सरकार आता सिनेमेट्रोग्राफ अ‍ॅक्ट १९५२ मध्ये काही दुरुस्त्या करणार आहे. दुरुस्तीनंतर या कायद्याला सिनेमेट्रोग्राफ अ‍ॅक्ट २०२१ असे म्हटले जाईल. या कायद्यात एकूण सहा दुरुस्ती केल्या जाणार आहेत.

त्यापैकी पहिली दुरुस्ती म्हणजे सर्टिफिकेट मिळाल्यानंतरही जर कोणी एखाद्या चित्रपटाबाबत विरोध दर्शवला तर त्या चित्रपटाचे पुन्हा एकदा सीबीएफसीद्वारे समीक्षण केले जाईल. तसेच चित्रपटगृहांमध्ये जाण्यापूर्वी प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या वयाचा दाखला दाखविणे बंधनकारक राहील. कारण यापुढे प्रेक्षकांची तीन विभागात वर्गवारी केली जाणार आहे. यामध्ये ७ वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि १८ वर्षाखालील प्रेक्षक असे विभाजन असेल, असे सांगण्यात आले.

उमरग्यात वेश्या व्यवसायात अडकल्या अल्पवयीन युवती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या