25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home मनोरंजन 'लय भारी' दिग्दर्शक हरपला, रितेशचं भावुक ट्विट

‘लय भारी’ दिग्दर्शक हरपला, रितेशचं भावुक ट्विट

एकमत ऑनलाईन

मुंबई :  ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ आणि ‘दृष्यम’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शनक निशिकांत कामत यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख यांनी कामत यांच्या निधनाचे वृत्त चुकीचे आसल्याचे सांगितले होते. मात्र आज संध्याकाळी चार वाजता निशिकांत कामत यांनी अखरेचा श्वास घेतला.

निशिकांत कामत यांना Liver Cirrhosis चा त्रास होता. त्यामुळे त्यांना 11 ऑगस्टरोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याचे ट्विट अभिनेत्री रुचा लखेरा हिने केले होते. यानंतर रितेश देशमुख यांनी कामत यांचे निधन झाले नसून ते जिवंत असल्याचे ट्विट केले होते. निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर आहेत. ते अजूनही जिवंत आहेत आणि लढा देत आहे. त्यांच्यासाठी प्रर्थना करुयात असे रितेशने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आता संध्याकाळी चार वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

निशिकांत कामतच्या निधनाच्या वृत्तावर कलाविश्वातील कलाकार सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, रितेश देशमुखने ट्विटरवर निशिकांत कामतसोबत गळाभेट करतानाचा फोटो शेअर करत ट्विट केले. त्याने म्हटले की, मित्रा तुझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.

निशिकांत कामत यांनी मराठी चित्रपट डोंबिवली फास्टपासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. डोंबिवली फास्ट हा चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंत केला होता. त्यानंतर 2008 मध्ये मुंबई मेरी जान या चित्रपटातही त्यांच काम पहायला मिळाल. हिंदी चित्रपटसृष्टीत दृश्यम हा चित्रपट आयुष्यातील महत्त्वाचा पैलू ठरला या चित्रपटामुळे त्यांचे खूप कौतुक झाले. अजय देवगण, तब्बू यां सारख्या मोठ्या कलाकारांसह केलेल्या चित्रपटाने अनेक पुस्कार पटकावले.

कामत हे बॉलिवूडमधील नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक होते. यात अजय देवगणचा दृश्यम, इरफान खानचा मदारी, जॉन अब्राहमचा फोर्स, आणि रॉकी हँडसम या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडआधी त्याने अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं होतं. तसेच कामही केलं होतं. चित्रपटात ते नकारात्मक भूमिका करत होते. भावेश जोशी सिनेमात त्याने काम केलं. होतं.

डिस्चार्ज मिळाला : नवनीत राणा लढल्या आणि जिंकल्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या