26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमनोरंजनरिंकूचा ‘बोल्ड’ भूमिकांना नकार!

रिंकूचा ‘बोल्ड’ भूमिकांना नकार!

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘सैराट’नंतर रिंकू राजगुरू अधिक चर्चेत आली. त्यानंतर तिचे लाईफ, करिअर या गोष्टी प्रेक्षकांना जाणून घेण्यात विशेष रस वाटू लागला.
‘सैराट’ चित्रपटावर न थांबता तिने पुढेही चित्रपटातील काम सुरू ठेवले आणि नवनवीन भूमिकांत ती दिसली. अनेक भूमिकांतून तिने वैविध्य जपले आहे. ‘सैराट’ नंतर कागर, मेकअप, झुंड, आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटांतील भूमिकांतून तिने आपली छाप पाडली आहे. पण या सिनेमांच्या दरम्यान रिंकूला अनेक सिनेमांची ऑफर आली.

पण त्या भूमिका तिने नाकारल्या. याबाबत रिंकू सांगते, मुळात ‘आर्ची’ या चौकटीत पुन्हा अडकायचं नाही आणि बोल्ड कंटेंटसाठी मी कम्फर्टेबल नाही. कथानकाची गरज नसूनही बोल्डनेसलाच कंटेंट बनवायचा असेल; त्यामुळे कलाकृती पाहिली जावी, अशी अपेक्षा असेल तर त्या वाटेला मी जाणार नाही.

याच कारणाने मी त्या भूमिकांना नकार दिला आहे. सतत कुठेतरी दिसत राहावे असे मला वाटत नाही. अजूनही मी अबोल, बुजरी आहे. सातत्याने चांगल्या कलाकृतीतून आपण दिसावे आणि अभिनयासाठी आपण लोकांच्या लक्षात राहावे असे मला वाटते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या